testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

येत्या 5 जून ला मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद

maharashatra
Last Modified शनिवार, 3 जून 2017 (09:47 IST)
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच, 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी शेतक-यांनी घेतला आहे.
पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाने
पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच, 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मध्यस्थी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान,
शेतकरी संपाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाला मुंबईत बोलावले असून, रात्री आठ वाजता ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार आहे. या बैठकीसाठी पुणतांबा येथून शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहे.


यावर अधिक वाचा :