बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (21:46 IST)

Maharashtra Live News Today in Marathi महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राज्यात आठवडाभरात नऊ सभा घेणार आहेत. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

आज शनिवार 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी अकोला आणि नांदेडमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहे.

काँग्रेस जातींना लढविण्याचे काम करत आहे, महाराष्ट्रात गरजले नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा आरोप केला आणि लोकांना एकजूट राहण्याचा इशारा दिला. काँग्रेस उपेक्षित गटांविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचेही त्यांनी सांगितले. या भागात आदिवासी समाजाचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान मोदींची ही पहिलीच सभा होती.

महाराष्ट्रः खऱ्या-खोट्याच्या लढाईत अडकले उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे-अजितपवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खऱ्या-खोट्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा पराभव झाल्यास राज्याच्या राजकारणातील अस्तित्व धोक्यात येऊ शकते. 

एकनाथ शिंदे यांनी पुण्यात व्हीबीएचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली
रॅलीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि ही राजकीय बैठक नसून ते माझे मित्र आहे असे सांगितले.  
 

गोंदियातील काँग्रेस उमेदवार निवडणूक प्रचारात व्यस्त, घरात पडला दरोडा
अज्ञात चोरट्यांनी माजी आमदारांच्या घरातील बेडरुममध्ये ठेवलेले कपाटाचे लॉकर एकूण 4 लाख 47 हजार 500 रुपयांचा माल पळवून नेला. 

बारामतीत पंतप्रधान मोदींची 'नो एंट्री'! अजित पवारांच्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
खरे तर पंतप्रधान मोदींसारखे मोठे नेते छोट्या ठिकाणी निवडणूक सभा घेत नाही, त्यामुळे बारामतीत निवडणूक सभा घेणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसं पाहिलं तर बारामतीतून यावेळी खुद्द अजित पवार रिंगणात आहे. तसेच यावेळी त्यांचा सामना त्यांचा पुतण्या आणि शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. 

मुंबईत दोन कोटींची रोकड सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने दिले कडक कारवाईचे आदेश
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रलोभनाच्या मुद्द्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मुंबई पोलिसांनी काळबादेवी परिसरात 2 कोटींहून अधिक रोकड जप्त केली असून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या वसुलीची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.  

महाराष्ट्रातील तरुणांकडून भाजपने रोजगार हिसकावला-आदित्य ठाकरे
अमित शहांनी केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा!
भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर महायुतीचे सरकार सत्तेत राहावे अशी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे.
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान मोदींचा अकोल्यात काँग्रेसवर हल्लाबोल
Prime Minister Modi in Akola : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येत्या 20 नोवेम्बर रोजी आणि मतमोजणी 23 नोवेम्बर रोजी होणार असून निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकाच्या प्रचारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहे. ते महाराष्ट्रात निवडणुका सभा घेत प्रचार करत आहे. काल त्यानी धुळे आणि  नाशिकात प्रचार सभा घेतली त्यात त्यांनी कांग्रेस पक्षावर गर्जना केली.

नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर समाज तोडल्याचा आरोप
PM Modi in Nanded News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकासाठी भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात सभा घेत आहे. काल त्यांनी धुळे अणि नाशिकात सभा घेतली आज त्यांनी नांदेड़ आणि अकोल्यात सभा घेतली. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाना साधला.
मुंबईत फसवणुकीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश, 19 जणांना अटक-15
माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण अधिकच तापले आहे.सर्व राजकीय पक्ष निवडणुकासाठी जय्यत तयारीला लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. ज्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रस्तावित आहे. 23 नोव्हेंबरला सर्व मतदारसंघांचे निकाल एकत्रित जाहीर होणार आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने खुलासा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई हा पुणेकर टोळीच्या रडारवरचा आणखी एक नेता होता. या टोळीने त्यांनाही ठार मारण्याचा कट रचला होता आणि त्यांच्या नेमबाजांमार्फत गुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी दिली होती.
 

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका
Sharad Pawar News :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महाआघाडीवर निशाणा साधला. ज्या युतीला शेती कळत नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांची चिंता नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले