बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (09:12 IST)

राज्यात कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित, टेस्टचे नवे दर १,२०० रुपये

महाराष्ट्रामध्ये कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टचे नवे दर १,२०० रुपये एवढे असतील. १,९०० रुपयांवरुन हे दर १,२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब आता १,२०० रुपयांच्या वर दर आकारू शकणार नाहीत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 
 
सुरुवातीच्या काळात राज्यात कोरोना टेस्टसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. या तक्रारींनंतर कोरोनाचे दर ४,५०० हजार रुपयांच्या घरात आणण्यात आले. नंतर हेच दर २,४०० ते २,८०० रुपये करण्यात आले. आता हे दर १,२०० रुपयांवर आणण्यात आले आहेत.