शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जून 2020 (16:22 IST)

अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य राज्य सरकारनं बिगर व्यावसायिक / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अंतिम वर्षाची /अंतिम सेमिस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे वातावरण अद्याप कोणतीही परीक्षा किंवा वर्ग घेण्यास अनुकूल नसल्याने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची / अंतिम सेमेस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
 
मुख्यमंत्री कार्यालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. तसंच यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.