शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (20:07 IST)

राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षा, सेंटरवर जाण्याआधी हे नियम वाचा

cbse exam
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावी बोर्ड  परीक्षेला आजपासून  सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीनंतर ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने राज्यभरात घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यात एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्र असतील.
 
= इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असणार आहे. या
= परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधीच परीक्षा केंद्रावर येण्याची सूचना करण्यात आली आहे.
=तीन तासांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात येणार आहे.
=यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्याने यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिट तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.
= सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत आहे.
 
परीक्षेच्या आयोजनासंदर्भात बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा देण्यासाठी एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी, zig zag पद्धतीने परीक्षेला बसतील. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक तयार करत असताना परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे.
 
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे
 
नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहे. 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.