सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (15:59 IST)

महाराष्ट्र मॉन्सून अपडेट: मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 13 राज्यांनी यलो अलर्ट जारी केला

दक्षिण-पश्चिम भारताला भिजवल्यानंतर मान्सून ईशान्येकडील राज्यांवर सक्रिय झाला आहे. ओडिशा - पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. मंगळवारी सकाळी मुंबईत मुसळधार पाऊस पडला. येत्या तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केला आहे. त्यासह जीर्ण इमारती रिकाम्या करण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे, 10 जून रोजी ईशान्य भागात जोरदार गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे मध्य प्रदेशात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे.
 
मुंबई आणि कोंकणात पावसाचा थैमान, सीएमने केलं प्रशासनाला अलर्ट
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्र अर्थात आरएमसीने 10 जून ते 12 जून पर्यंत किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्य जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमहीने पाच दिवसांसाठी जिल्हावार अंदाज जाहीर केला आहे. 11 जून साठी मुंबई, ठाणे, पालघर यासाठी येलो अलर्ट जाहीर केलं आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. अधिकार्‍यांप्रमाणे मुंबईसाठी कलर कोडिंग अपडेट होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त अहमदनगर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, पालघर, परभणी, पुणे, रायगड आणि ठाण्यात विजांच्या गडगडाटीसह, सुसाट वारं आणि जोरदार पावासाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
आयएमडी अधिकार्‍यांप्रमाणे सोमवारपर्यंत मान्सूनची उत्तरी सीमा अलीबाग, पुणे, मेडक, नलगोंडा, रेंटाचिंटाला आणि श्रीहरिकोटा येथून जात आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस गंभीर हवामानाची चेतावणी दिली आहे.
 
दरम्यान सीएम उद्दव ठाकरे यांनी राज्य प्रशासनाला अलर्ट राहण्यास सांगितले आहे. त्यांनी निर्देश दिले की यामुळे कोविड 19 रुग्णांच्या उपचारावर परिणाम होता कामा नये. त्यांनी वेळे पडल्यास संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे निर्देशही दिले.
 
हवामान खात्याने मंगळवारी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी मध्य प्रदेशात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. इंदूर, भोपाळ, छिंदवाडा, शाजापूर, मंदसौर सागर यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. भोपाळमध्ये अर्ध्या तासासाठी 14.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून इंदूरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
बंगालमध्ये पाऊस आपत्ती ठरली
सोमवारी पश्चिम बंगालमध्ये हवामानाचा कहर झाला. राज्यातील 3 जिल्ह्यात वीज कोसळल्याने 26 जणांचा मृत्यू. मृतांपैकी 11 जण हूग्लीचे, 9 मुर्शिदाबादचे, 2 बांकुरा आणि 2 पूर्वी मिदनापूरचे आहेत. या घटनेनंतर पीएम मोदी यांनी अपघातात मरण पावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 
झारखंडमध्ये 10 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
झारखंडच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले. मंगळवारी सकाळपासूनच धनबादमध्ये ढगाळ वातावरण होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे.