Widgets Magazine
Widgets Magazine

गुन्हेगारांची माहिती मिळविण्यासाठी आधारची मदत

aadhar
गुन्हेगारांच्या इत्थंभूत माहिती गोळा करण्यासाठी सीसीटीएनएससोबत आधार क्रमांक जोडण्याचा प्रयत्न असून त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मागण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
Widgets Magazine

सीसीटीएनएसमुळे देशभरातील सर्व गुन्ह्य़ांची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिसंदर्भात माहिती मिळवायची असल्यास सीसीटीएनएसवर एक नाव टाकले तर त्याने देशभरात किती गुन्हे केले, याची माहिती मिळेल. त्यावर आधार जोडण्यात आल्यास हाताचे ठसे आणि बायोमेट्रिक माहिती उपब्लध होईल. त्यामुळे आरोपी शोधणे अधिक सोपे होईल. कोणताही आरोपी पोलिसांपासून अधिक काळ पळू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :