Widgets Magazine

रस्त्यातील खड्डे प्रकरणी सरकारला फटकार

खड्ड्यांमुळे आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर मुंबई आणि राज्यातल्या रस्त्यांची अवस्था सुधारणार, असा परखड सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं यंत्रणांची कानउघडणी केलीय.
सध्या मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळं अक्षरशः चाळण झालीय. तर नागपूर आणि कल्याणमध्ये खडड्यांमुळं दोघांना जीव गमवावा लागलाय. राज्यातल्या रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळं मुंबई उच्च न्यायालयानं सुओ मोटो याचिका दाखल करून घेतलीय. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं पालिका आणि राज्य सरकारला चांगलच फटकारलं आहे. लोकांना चांगल्या दर्जाचे रस्ते देणं, हे सरकारचं कर्तव्य असल्याची आठवण उच्च न्यायालयानं करून दिली आहे.


यावर अधिक वाचा :