ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार खोटं बोलतंय- चंद्रशेखर बावनकुळे
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.
ओबीसी समाजाचा एम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने तज्ज्ञांच्या मदतीने प्रश्नावली तयार केली आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर खोटं बोलत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
नवीन एम्पेरिकल डेटा तयार करायचा होता. मात्र, या लोकांनी ओबीसी समाजाची दिशाभूल केली. केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले. 2011 चा जनगणनेचा डेटा हा 2011 च्या जिल्हा परिषदेच्या कामाचा नव्हता. नवीन डेटा तयार करायचा होता. पण या सरकारनं ते काम केलं नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं.