सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2024 (11:02 IST)

महाविकास आघाडी प्रत्येक जागेवर काम करत आहे-संजय राऊत

sanjay raut
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, की दिल्लीत अल्पमताचे सरकार बसले आहे. हे सरकार निवडून आल्यापासून मोहन भागवत यांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहे. देशात जे काही सुरु आहे. ते लोकतंत्र आणि संविधानासाठी योग्य नाही.   
 
 महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या  सूत्रावर चर्चा सुरु आहे. आणि प्रत्येक पक्ष आपापल्या जागांचे मूल्यांकन करत असल्याचे म्हटले आहे. 
 
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना ते म्हणाले, तिन्ही पक्ष प्रमुख असून ते आपापल्या जागेवर मूल्यांकन करत आहे. या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबई हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जागा वाटपावर भाष्य करताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला सर्व जागांवर त्यांची ताकद लक्षात घेऊन निवडणूक कुठे लढवायची आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र भेटल्यावर जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल. 
 
Edited by - Priya Dixit