शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नाशिक , शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (10:49 IST)

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर आदर्श आचारसंहिता लागू

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  या मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारसंघात येणाऱ्या विभागातील पाचही जिल्ह्यात तात्काळ प्रभावासह आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त  एकनाथ डवले यांनी दिले.
 
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 10 जानेवारी (मंगळवार) रोजी या निवडणूकीसाठी अधिसूचना जारी होईल. दिनांक 17 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 18 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. वीस जानेवारी ही अर्ज माघारी घेण्याची अखेरची मुदत असेल.  निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 ही असेल. मतमोजणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.