Widgets Magazine
Widgets Magazine

बोकड दूध देतो....!

male goat

गाई-म्हशी शेळी दूध देतात, हे तुम्हा- आम्हाला माहीत आहे. मात्र, बोकड दूध देतो, असे म्हटले तर? ऐकून आश्चार्याचा धक्का बसेल, पण हे खरे आहे. गोंदियातील एक बोकड चक्क दूध देतो. तालुक्यामधील पिपरटोला गावातील कटरे कुटुंबीय हे गेल्या 50 वर्षांपासून शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत.
 
कटरे कुटुंबाकडे सध्या 40 हून अधिक दुभत्या बकर्‍या, शेळ्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी पिपरटोला गावात मेंढी पालन करणारे लोक आले होते. उच्च दर्जाच्या शेळ्या उत्पादित करण्यासाठी त्यांच्याकडून कटरे कुटुंबीयानी तोतापुरी प्रजातीचा बोकड खरेदी केला. इतर बकर्‍यांप्रमाणे बोकडाला देखील आंघोळ घालून उन्हात उभे केले असता, बकर्‍याच्या स्तनातून दूध टपकायला लागले. पहिल्या दिवशी या अजुबा नावाच्या बोकडाने 150 मिली दूध दिले. दूध देणार्‍या अजुबा बोकडाविषयी गोरगावच्या पशुवैद्यकीय अधिकर्‍यांना माहिती देण्यात आली.
 
डॉक्टरांनी बोकडाची वैद्यकीय तपासणी केली असता, बोकडाला गानोकोमोसटिया नावाचा आजार झाला असल्याने आणि बोकडाच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने बोकड दूध देत असल्याचे डॉक्यरांचे म्हणणे आहे. 25 हजार रूपयांना खरेदी केलेल्या या बोकडाला आज दीड लाख रूपयांपर्यंतची मागणी आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अमित शहांच्या दौर्‍यासाठी शाळा बंद

भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या हरियाणाच्या दौर्‍यावर आहेत. या निमित्ताने भाजपकडून एका रॅलीचे ...

news

प्राप्तिकर विभागाकडून तब्बल 15 कोटींची रोकड, दागिने जप्त

कर्नाटकचे ऊर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांना लक्ष्य करून प्राप्तिकर ...

news

अमेरिकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची आणि पंकजा मुंडे यांची भेट

‘लेजिस्लेटीव्ह फेलोज प्रोग्राम’ अंतर्गत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र ...

news

अकार्यक्षम कुलगुरूंना हटवण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे अकार्यक्षम कुलगुरू डॉ. संजय ...

Widgets Magazine