शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2019 (09:28 IST)

मलकापूर नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भीषण अपघात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनर आणि टाटा मॅजिकच्या भीषण अपघातात झाला असून त्यात १२ प्रवाशांसह चालक अशा १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सोमवारी घडला आहे. गाडीत फक्त १२ प्रवाशांची क्षमता नसतानाही या वाहनात अतिरिक्त प्रवाशी भरले होते. मलकापूर येथे नॅशनल हायवेवर रसोय कंपनीजवळ भऱधाव कंटेनर आणि टाटा मॅजिकची धडक झाली. दुपारी तीनच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या टाटा मॅजिकला कंटनेरने धडक दिल्याने यातील १२ प्रवाशांसह चालकही जागीच ठार झाला आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील दोन्ही वाहने रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरु केले. तर मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मॅजिक या खासगी वाहनात क्षमतेपेक्षा अधिक 16 जण कोंबून भरले होते. ते मलकापूरच्या दिशेने निघाले होते. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव टँकरने व्हॅनला धडक दिली. या कंटेनरमध्ये केमिकल भरलेले होते. त्यामुळे, बचावकार्यात विलंब झाला. सुरुवातीला या अपघातात 8 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. परंतु, बचावकार्यात एकूणच 13 मृतदेह सापडले आहेत.  
 
या भीषण अपघातात मुकुंद ढगे (वय ४०, अनुराबाद), छाया गजानन खडसे (वय ३७, रा. अनुराबाद), अशोक लहू फिरके (वय ५५, रा. अनुराबाद), नथ्थू वामन चौधरी (वय ४५, अनुराबाद), आरती, रेखा, सोयीबाई छगन शिवरकर ( वय २९, रा. नागझरी बहाणपूर), विरेन ब्रिजलाल मिळवतकर (वय ७, नागझरी बहाणपुर), सतीश छगन शिवरकर (वय ३), मीनाबाई बिलोलकर, किसन सुखदेव बोराडे, प्रकाश भारंबे (रा. जामनेर रोड भुसावळ), मेघा प्रकाश भारंबे असी १३ जण जागीच ठार झाले. तर गोकुल भालचंद्र भिलवसकर, छगन राजू शिवरकर (वय २६, नागझरी, जि. बुहाणपूर) अशी जखमींची नावे आहेत.