गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:31 IST)

मालवण :हायस्पीड ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांची जाळी तोडली शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांचे जगणे मुश्कील केले आहे. हे ट्रॉलर्स बेकायदेशीररित्या मासळीची लूट करीतच आहेत. आता स्थानिक मच्छीमारांची जाळी देखील तोडून नेत आहेत. या ट्रॉलर्सनी रविवारी तळाशील येथील संजय केळुसकर आणि दांडी येथील अर्जुन धुरी यांची जाळी तोडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले. शनिवारी दुपारी केळुसकर यांची नौका गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीसाठी गेली होती. त्यांची चार जाळी हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडली. तर धुरी रविवारी पहाटे बांगडे पकडण्यासाठी मासेमारीस गेले होते. त्यांची पाच जाळी हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडली. ऐन मत्स्य हंगामाच्या प्रारंभीच जाळ्यांचे नुकसान झाल्याने मच्छीमारांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. शासनाने दोन्ही मच्छीमारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.