बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:26 IST)

मनमाड रेल्वेस्थानकावर तरूणाची हत्या

मनमाड रेल्वे स्थानकावर शिवराम पवार याच्यावर मध्यरात्री 12 ते 1 च्यादरम्यान खूनी हल्ला करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 
   
 मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची हत्या करुन चार ते पाच तरुण फरार झाले आहेत. मैत्रिणीला फेक आयडी बनवून त्रास दिल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी फरार झाले असून रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतंर अधिक माहिती मिळेल.  
 
तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. आरोपींनी रेल्वे स्थानकावर शिवराम पवार या तरुणावर चाकूनं वार केले. शिवराम पवार याचा खून करुन चार ते पाच तरुण फरार झाले असून पोलिसांकडून या प्रकरणी घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला आहे.