1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (10:36 IST)

विधानसभा निवडणुकीच्या आगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून अनेक भाजपात येणार - राधाकृष्ण विखे

BJP workers
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीचे अनेक नेते आमदार संपर्कात असून, काही भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत, असा दावा काँग्रेसचा राजीनामा देऊन थेट भाजपकडून मंत्रिमंडळात दाखल झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील सोलापुरात पुढे म्हणाले की, आघाडी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक नाराज असून, म्हणून मी देखील बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील काळात भाजप प्रवेशासाठी अनेकजण उत्सुक आहेत. काही जण संपर्कात आहेत. मात्र पक्ष अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी प्रवेश केला तर नवल नाही. मेळ घालावा लागेल. त्यामुळे देवेद्र फडणवीस येत्या काळात आघाडीला मोठा धक्का देतील हे उघड आहे. सध्या राज्यात कॉंग्रेसची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यामुळे आता विखे कोणता धक्का देतात हे येता काळच ठरवेल.