रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (13:20 IST)

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू

शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी शिवारातील धुमाळ वस्तीवर  ही घटना घडली आहे. सचिन हनुमंत धुमाळ (वय 22), अमोल हनुमंत धुमाळ (वय 25) अशी मृत भावांची नावे आहेत.
 
सचिनने नेहमीप्रमाणे गाईंची धार काढली व शेडवर लटकवलेल्या रात्रीच्या दुधाची बादली काढत असताना त्याला विजेचा धक्का बसला. सचिनचा आवाज ऐकून त्याचा भाऊ अमोल त्याच्या मदतीला गेला. मात्र, त्यालाही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.
 
दरम्यान, अमोलचे नुकतेच लग्न झाले होते. त्याला अवघ्या सात महिन्यांची मुलगी आहे.