बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (09:22 IST)

मराठा आरक्षणावर आजपासून उच्च न्यायालयात सुनावणी

२७ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अख्या राज्याचे लक्ष असलेल्या मराठा आरक्षण्चा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायलयाने लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. त्यामुळे आज २७  फेब्रुवारीपासून याची दैनंदिन सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे.
 
उद्यापासून कोर्ट रुम ५२ मध्ये याची दैनंदिन सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर  ७  डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यापुढील सुनावणीला उद्या  २७  फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ८० टक्क्यांहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे प्रतिज्ञापत्र सरकारने गेल्या वेळच्या सुनावणीत सादर केले होते.कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावाही सरकारने केला होता. त्यामुळे यापुढील सुनावणीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.