1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (16:48 IST)

मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन, एकाचा मृत्यू

Maratha Aarakshan
औरंगाबादजवळील कायगाव टोक येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एका तरुणाने पुलावरुन नदीत उडी मारली. सदरची  घटना सोमवारी दुपारी घडली. काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे या तरुणाचे नाव असून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला.
 
गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी दुपारी  कायगाव टोक येथील नदीवरील पुलावरुन त्याने उडी मारली. स्थानिक पोलिसांनी तातडीने काकासाहेब शिंदेला पाण्याबाहेर काढले. त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा जलसमाधी घेऊ, असे त्याने उडी मारण्यापूर्वी म्हटले होते. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.