गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (10:36 IST)

आता मराठा आरक्षण मुद्धा पेटला मुलीची आत्महत्या

Maratha Aarakshan
उस्मानाबाद जिल्ह्यातील भागातील कळंब तालुक्यातील देवळाली येथील मराठा आरक्षणासाठी तृष्णा तानाजी माने (१९) तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार तिचा मृत्यू झाला आहे. देवळाली गावातील ग्रामस्थांनी शासन मराठा आरक्षणप्रश्नी दुर्लक्ष करीत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करत करत तिचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढून त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आणि मयत तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी तणाव निर्माण होवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त केला होता. तिचे वडील तानाजी माने यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शिकूनही उपयोग नाही, असे सांगत तृष्णाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दिवसन दिवस आरक्षण मुद्दा पेटत असून सरकार काय निणर्य घेतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.