शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 जुलै 2018 (15:48 IST)

मराठा मोर्चा आंदोलनाची आचारसंहिता भंग अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक

मराठा क्रांती मोर्चा समितीने या आगोदर पूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने शांततेत महराष्ट्रात आंदोलन सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्र आणि देशात बंद पुकारला त्या साठी सुद्धा समन्वय समितीने आचारसंहिता दिली होती. मात्र ती अनेक ठिकाणी भंग झाली आहे. अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले असून बस, गाड्या, पोलिसांवर दगडफेक सुद्धा झाली आहे. त्यामुळे मराठी क्रांती मोर्चा नक्की शांततेत होता का ? असा प्रश्न पडला आहे. 
 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हिंसक वळण लागलं होतं. त्याची दखल घेऊन, आजचा 'मुंबई बंद' शांततापूर्ण मार्गाने करण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केलं असलं तरी, त्यांच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याचं चित्र मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. 
 
ठाणे स्टेशनात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मराठा आंदोलकांनी वेगवेगळ्या ट्रॅकवर उतरून अप-डाउन लोकल अडवल्या. 
मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मुंबई बंदचा फटका बसला  
साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक 
नवी मुंबईतील कळंबोली येथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला
मुंबईतील मराठा आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम, ठाणे-वाशी, ठाणे-नेरुळ मार्गावरील लोकलसेवा बंद  
नवी मुंबई सायन पनवेल महामार्ग वाशी गाव रास्ता रोको 
साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक
मराठा आंदोलकांच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणा, जोगेश्वरीजवळ आंदोलकांकडून लोकल रोखण्याचा प्रयत्न