Widgets Magazine
Widgets Magazine

नवरदेव भर लग्न मंडपात हृद्यविकारच्या धक्क्याने मृत ; वधु सह सर्वाना धक्का

शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:03 IST)

marriage

शनिवारी सकाळी मिरजेत लग्नाच्या अक्षतांना केवळ तीन तास राहिले असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना  घडली. या नवरदेवाचे नाव रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे  आहे. त्याचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने  झाला. नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषालीशी मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील  ठरविण्यात आला होता.  मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आरोप झाले म्हणून राजींनामा हे चुकीचे - ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली तर आम्ही पक्ष म्हणून शिवसेना सुभाष देसाई यांच्या ...

news

स्वातंत्रदिनानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

स्वातंत्रदिनानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मंत्रिमंडळ ...

news

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा घोळ कायम

मुंबई विद्यापीठाच्या लागलेल्या निकालात विद्यापीठाने फक्त उत्तरपत्रिकांच्या पुरवणी तपासूनच ...

news

बाबरी मशिद प्रकरण : पुढील सुनावणी पाच डिसेंबरला

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादावर शुक्रवारी ...

Widgets Magazine