मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंकजा ताई मुंढे यांच्या जिल्ह्यात जेसीबी विवाहितेच्या जीवाशी, हुंड्यासाठी हत्या

married women
जेसीबी खरेदी करायची आहे म्हणून विवाहितेच्या माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत फक्त वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय. हे सर्व प्रकरण राज्य मंत्री पंक्जाताई मुंढे यांच्या बीड जिल्ह्यात घडला आहे. या गंभीर प्रकरणी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. शिरुर तालुक्यातील ही घटना आहे.
 
या वधूचे नाव अमृता तांबे असून तिचे जून 2018 मध्ये लग्न झालं होतं. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसातच तिचा पैशासाठी आतोनात छळ करायला सुरुवात केली होती. तिने हा सर्व प्रकार अनेकदा तिच्या माहेरच्या लोकांना तक्रार करत सांगितली होती. मात्र मंगळवारी पहाटे अमृताचा मृत्यू झाल्याची माहिती घरच्या लोकांना कळली, अमृताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला गेला,  मात्र तिने गळफास घेतलेला नसून तिचा   जेसीबीसाठी पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळींना अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मध्ये आता पोलिस कश्या प्रकारे भुमीका घेतात या कडे तिच्या नातेवाईकांचे लक्ष आहे.