1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (21:18 IST)

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधन

Minister of State Bachchu Kadu's mother dies after a long illness राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधनMarathi Regional News  In Wedunia Marathi
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बच्चू कडू यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. इंदिराबाईंनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
 
इंदिराबाई या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी इंदिराबाईंनी अखेरचा श्वास घेतला.बच्चू कडू यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी माझी आई इंदिराबाई बाबाराव कडू यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
 
त्यांच्या पार्थिवावर रविवार, १३ मार्च २०२२ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चादुनार तालुक्यातील बेलोरा गावात सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.”