शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (11:36 IST)

मिरज दंगल : 51 जणांविरुद्धचा खटला सरकारने मागे घेतला

मिरजेत 2009 मध्ये गणेशोत्सवात पोस्टरच्या वादातून दंगल झाली होती. या प्रकरणी 51 जणांविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला एक खटला सरकारने मागे घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी  मिरज न्यायालयात गृह विभागाचा खटला मागे घेण्यात आल्याबाबतचे पत्र सादर केले. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील असे भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या 51 जणांविरुद्धचा खटला मागे घेण्यात आला आहे.

मिरजेत 2009 मध्ये दंगलीप्रसंगी जमावाने ब्राह्मणपुरीतील गजानन मंगल कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला होता. पोलिसांनी श्रीकांत चौकात जमावाला रोखल्यानंतर, जमावाने पोलिसांवर दगडफेक करून रस्त्यावर टायर पेटवले होते. यात पोलिस वाहनासह चौकातील हॉटेल आणि दुकानांवर दगडफेक करून 50 ते 60 हजारांचे नुकसान व पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप, शिवसेनेच्या 51 कार्यकर्त्यांवर मिरज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.