testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मनसे आक्रमक चोपले परप्रांतीयांना

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये मनसेच्या सांगली येथील शाखेने कुपवाड एमआयडीसी येथे कार्यकर्त्यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा समोर करत
केली आहे. यामध्ये मनसे रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत राडा घातला असून त्यांनी पळवून पळवून
परप्रांतीयांना चोपले आहे.
सांगली येथील जिल्हाप्रमुख असलेल्या
तानाजी सावंत यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यांच्या नोकऱ्या हे बिहारी युपी वाले हिसकावतात त्यामुळे परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केले आहे. यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार परप्रांतीय कामगार काम करत आहेत. या कामगारांना विरोध करण्यासाठी मनसेने आंदोलन केलं आहे. खरेदीसाठी कामगार कुपवाड बाजारात आले असता मनसे कार्यकर्त्यांनी पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. राज ठाकरे येत्या काही दिवसात मुंबई येथे फेरीवाला हटाव सुरु करणार आहे. त्यामुळे परप्रांतीय हा मुद्दा पुन्हा पेटणार असून मनसेला यावेळी याचा फायदा होवू शकतो.


यावर अधिक वाचा :