Widgets Magazine

असे केले राज ठाकरेंनी शिवसैनिकांना हस्तांदोलन

raj thakare
Last Modified सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:39 IST)
दसऱ्यानिमित्त पार पडलेल्या
मेळाव्यानंतर शिवसैनिक घरी परतत होते. त्यावेळी काही शिवसैनिक शिवतीर्थाच्या बाजूलाच राहणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेरुन जात होते.
राज ठाकरे तळमजल्यावर काचेच्या खोलीत काहीतरी लेखन करत बसले होते. त्यावेळी बाहेरुन जाणाऱ्या शिवसैनिकांना राज ठाकरे दिसले आणि ते थांबले.

या शिवसैनिकांनी राज ठाकरेंना कंपाऊंडबाहेरुनच हाका मारण्यास सुरुवात केली. ‘राजसाहेब बाहेर या’ अशा घोषणा सुरु झाल्या. तिथे सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना गप्प करण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांना राज ठाकरेंना उद्देशून घोषणा सुरुच ठेवल्या.

राज ठाकरेंनी सुरुवातीला हाका मारणाऱ्या शिवसैनिकांना आतूनच अभिवादन केलं. मात्र शिवसैनिक घोषणा देण्याचे काही थांबत नव्हते. मग अखेर राज ठाकरे स्वत: बाहेर आले आणि त्यांनी तिथे जमलेल्या शिवसैनिकांना हस्तांदोलन केले.यावर अधिक वाचा :