testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Widgets Magazine
Widgets Magazine

राणेंची नव्या पक्ष स्थापनेतून शिवसेनेवर टीका

narayan rane
Last Modified सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (09:37 IST)
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली. या माध्यमातून शिवसेनेवर बोचरी टीका करत उद्धव ठाकरे हेच मुख्य लक्ष्य असतील, असेही स्पष्ट केले.
‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या माझ्या पक्षाची राज्यघटनेशी अविचल बांधिलकी असेल. लवकरच पक्षाची नोंदणी करून झेंडा आणि निशाणी जाहीर करू. ‘सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच आम्ही राजकारण करू आणि दिला शब्द पाळू’ हेच आमचे ब्रीदवाक्य असेल, असेही राणे यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे ‘कुजके-नासके विचार’ होते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव आणि शिवसेनाच राजकीय विरोधक असतील, असे स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :