मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (20:55 IST)

मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

महामार्गाचे राजापुरातील काम अपूर्ण असताना टोलवसुलीचा पयत्न करण्यात येत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाक्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गाचे राजापुरातील काम अपूर्ण असताना हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर यापूर्वी दोन ते तीनवेळा टोलवसुली करण्याचा पयत्न संबंधित ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला होता.यावेळी टोलवसुलीविरोधात तालुकावासियांनी जोरदार आंदोलनही केले होते. त्यामुळे टोलवसुली थांबवण्यात आली होती.अशातच गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा घेतलेल्या काही अज्ञातांनी टोलनाक्यावर तोडफोड केली. दंडुक्याच्या सहाय्याने टोलवसुली केबीनच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.