मनसे, भाजप, व्यापारी संघटनांपाठोपाठ महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला विरोध
महाविकास आघाडीने त्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काही संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी भाजप आणि व्यापारी संघटनांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आता मनसेने देखील भाजप, व्यापारी संघटनां पाठोपाठ महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला विरोध दर्शविला आहे.
लखिमपूर खेरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही देखील त्याचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमकं कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचा तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी जाहीर केली आहे. महाराष्ट्र बंदला व्यापारी संघटनांचा विरोध खेचू नका, असं आवाहन विरेन शहा यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केलं आहे. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं झालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असं सांगत विरेन शहा यांनी मुंबई व्यापार संघाची भूमिका मांडली.