शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (11:21 IST)

कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करा, मनसेने केली मागणी

मुंबईतील दादर स्टेशनबाहेर असलेल्या ब्रिटिशकालीन कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं सांगत राज ठाकरे यांच्या मनसेने हा कबुतरखाना म्हणजे कबुतरांचं अनधिकृत खाद्यकेंद्र बंद करण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना मनसेतर्फे पत्र लिहिण्यात आलं आहे. 

कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडल्याचं या पत्रात म्हटलं आहे. पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतींच्या खिडक्या खराब झाल्याचाही उल्लेख आहे.अनेक रहिवाशांनी त्यांना कबुतरांच्या पिसांमुळे श्वासाचे त्रास आणि अस्थमा झाल्याची तक्रार आमच्याकडे केली आहे. शहरात कबुतरांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे दादरमधील कबुतरखाना बंद करण्याची मागणी आम्ही करत आहोत’, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे.