मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (10:26 IST)

प्रतापगड संवर्धनासाठी मनसे आमदाराचा पुढाकार, आता सरकारनेही लक्ष द्यावे

प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेले भूस्खलन रोखण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून निधी संकलन सुरु आहे. या निधी संकलनाची माहिती मिळताच आमदार राजू पाटील यांनी 5 लाखांची मदत केली . 
 
“सत्ताधारी शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत. मात्र, गड-किल्ल्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाही. गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक महत्व दिले जात असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एखादे स्वतंत्र मंडळ तयार करावे”, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
 
राजू पाटील म्हणाले, “छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही.