रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (17:17 IST)

यंदा मॉन्सूनचे आगमन लांबणार : हवामान विभाग

मॉन्सूनचा पाऊस येत्या सहा जून पर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन लांबणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्यासाठी हवामानाची परिस्थिती निर्माण होत असून अंदमान निकोबार बेटांचा दक्षिणेकडील भाग आणि बंगालच्या उपसागरावर १८ ते १९ मे दरम्यान मॉन्सून कार्यरत होईल अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
साधारणपणे जूनच्या १ तारखेला केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन होत असते. त्यात ७ दिवसांचा फरक पडू शकतो. इथे प्रवेश केल्यानंतर मॉन्सूनचा पाऊस उत्तरेकडे सरकतो आणि उष्णतेपासून त्यांना दिलासा मिळतो. मागच्या वर्षी २०१८ मध्ये २९ मे रोजीच मॉन्सूनने केरळच्या किनाऱ्यावर धडक दिली होती. हवामान खात्याने वर्तविलेला आगमनाचा दिनांक मागच्या वेळेस तंतोतंत खरा ठरला होता.