बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 5 जून 2021 (21:52 IST)

मान्सून महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी म्हणजे मान्सून शनिवार दि़ ५ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ही माहित देत सांगितले की मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला परिस्थिती अनुकुल आहे.
 
दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापला असून केरळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वार्‍याने कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली. कर्नाटकच्या किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल झाला.
 
पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल शिवाय पुढील या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 
11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असताना त्याआधीच मान्सून राज्यात दाखल झाल्याची माहिती हवामाने विभागाने दिली.