राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ
राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.
आत्तापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. 15 एप्रिल ते 7 ऑगस्ट या काळात 1 कोटी 72 लाख 32 हजार 695 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विशेष धोरण अवलंबून पूरग्रस्त भागात मोफत 92,017 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले.म्हणजे आत्तापर्यंत एकूण 1 कोटी 73 लाख 24 हजार 712 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात सद्यस्थितीत 1164 शिवभोजन केंद्र सुरू आहेत.