testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

crime
Last Modified शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:23 IST)

महिलांवरील वाढते अत्याचार व गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. मग ते कोपर्डी बलात्कार प्रकरण असो किंवा भायखळा जेल मधील मंजुळा शेट्ये हत्याकांड; ट्रेन,रिक्षा, टॅक्सी, बसमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, खाजगी व सहकारी कार्यालयात महिलांचे होणारे शोषण, यामुळे संपूर्ण राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ३ वर्षांत कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गृह मंत्रालय महिला अत्याचार व वाढती गुन्हेगारी रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याविरोधात राष्ट्रवादी मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधान भवनासमोर तीव्र आंदोलन केले.यावर अधिक वाचा :