शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (16:08 IST)

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यायांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्ष राऊत यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. अखेर चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. परिणामी संजय राऊत यांनाही करोनाची चाचणी करावी लागणार आहे.
कोरोनाची लक्षणे असल्याचं समोर आल्यानंतर वर्षा राऊत यांनी कोरोना चाचणी केली. ही चाचणी सकारात्मक आली आहे. मुंबईतल्या फोर्तीस रुग्णालयात त्यांना पुढील उपचारासाठी दाखल केलं आहे, असे समोर येते कि संजय राउत यांनाही करोनाची चाचणी करावी लागणार. तूर्तास तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती मिळत आहे.