बेस्टचा संप मुंबईत अजूनही सुरूच, सामन्य नागरिकांचे आतोनात हाल

msrtc-st-bus-strike-in-maharashtra
शिवसेनेच्या हातात असलेल्या बेस्ट अर्थात मुंबई लोकल बस सेवेचा आज संपाचा तिसरा दिवस आहे.
बसच्या या संपामुळे मुंबईकरांचे फार
हाल झाले आहेत. अद्यापही बेस्टचा संप सुरूच असून, बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा बेमुदत संप असल्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतय.
बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी
बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची बैठक होती,
तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष होते मात्र अजूनही काहीच हाती लागले नाही.
संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत त्यामुळे आता तर
संप आणखी चिघळणार आहे.

बेस्टचे कर्मचारी काही झाले तरी माघार घेणार असून,
संपावर ठाम आहेत. त्याच्न्या
मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत
संप सुरुच राहणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतलीय.
बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट भवनला कामगार संघटना व बेस्ट प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होतेय.
बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे सर्वात मोठी संघटना असलेल्या शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेनं संपातून माघार घेतली होती. त्यात
कामगार सेनेचे ११ हजार कर्मचारी कामावर रुजू होणार होते. मात्र कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिलाय.
शिवसेनेच्या संघटनेत असलेला बेबनाव देखील आता
समोर आलाय.
त्यामुळे शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेच्या सभासद, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, आणिक, वांद्रे आगारातील काही सभासदांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जर तोडगा निघाला नाही तर सामन्य माणूस देखील चिडून उठेल असे चित्र आहे. दररोज प्रवासी भाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दोन दिवसांत एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बेस्ट उपक्रमाचा दोन दिवसांचा महसूल बुडाला जवळपास तो ६ कोटी आहे आणि आजही संप मिटला नाही तर तो ९ कोटी होणार आहे.

या मागण्यांसाठी संप
1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

धक्कादायक : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना ...

धक्कादायक : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह
CISF नुसार, 142 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यापैकी काल 4 जणांचा अहवाल ...

मुसलमान समाज "भारतीय" कधी होणार?

मुसलमान समाज
स्वातंत्र्यानंतर गेल्या ७२ वर्षांच्या भारताच्या इतिहासात अनेक प्रश्न अनुत्तीर्ण राहिलेले ...

पुण्यातून मरकजमधील क्वारंटाईन केलेले १० जण फरार

पुण्यातून मरकजमधील क्वारंटाईन केलेले १० जण फरार
दिल्लीतील मरकजमधून परतल्यानंतर क्वारंटाईन केलेले १० जण शुक्रवारी पसार झाल्याचे धक्कादायक ...

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490
महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संख्या आता 490 वर पोहचली ...

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार ...