शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018 (16:25 IST)

डीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार

गणपती विसर्जनाच्या वेळी डीजे-डॉल्बी दिलासा मिळालेला नाही. डीजे-डॉल्बीवरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेता उच्च न्यायालयाने डीजे-डॉल्बीवरील बंदी येणार नाही असे म्हटले आहे. याआधी डीजे-डॉल्बी नाही अशीच ठाम भूमिका घेत राज्य सरकारने सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या वाद्यांवरील बंदीचे मुंबई उच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले.
 
डीजे- डॉल्बी आणि त्यासारखी इतर हाय डेसिबल ऑडीओ सिस्टीम ही कानठळय़ा बसविणारी अद्ययावत यंत्रणा आहे. डीजेचा स्वीच ऑन करताच त्याचा डेसिबल लेव्हल शंभरी पार करतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ही बाब लक्षात घेऊनच सणासुदीच्या काळात या ऑडीओ सिस्टीमला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात ठणकावून सांगितले होते.राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे डीजे-डॉल्बीच्या व्यवसायात असलेल्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. 
 
विशेष म्हणजे यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.