शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (10:09 IST)

लोकलट्रेन : महिलेला महिलेने चावा घेतला सोबत बेदम मारहाण

मुंबईमध्ये रोज लाखो लोक लोकल ट्रेनमध्ये प्रवास करता. त्यामुळे प्रवास करताना छोट्या मोठ्या कुरबुरी होतात. मात्र त्या तिथेच थांबतात. मात्र एका महिलेने शुल्लक कारणांवरून दुसऱ्या महिलेला बेदम तर मारलेच सोबतच तिचा जबर चावा देखील घेतला आहे. झाले असे की, बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये सेंकड क्लास डब्यातून प्रवास करताना एका महिलेचा चुकून दुसरीला धक्का लागला होता. या शुल्लक कारणावरून एका महिलेला सहप्रवासी महिलेने जबर मारहाण केली आहे. नजराना मनोज पिल्ले (35) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून, तिने वांद्रे रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 
नजराना या सांताक्रुज येथील गोळीबार येथे राहतात. त्या 16 सप्टेंबर रोजी त्यांनी संध्याकळी साडेसातच्या सुमारास लोअर परेल येथून बोरिवलीला जाणारी स्लो लोकल मध्ये बसल्या, संध्याकाळ असल्याने  ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे त्या दाटीवाटीत उभे राहून प्रवास करत होत्या. मात्र  त्याचवेळी त्यांचा चुकुन त्यांचा शेजारी उभ्या असलेल्या महिलेला धक्का लागला. या गोष्टीचा राग आल्याने त्या महिलेने नजराना यांच्याशी वाद घातला, सोबतच नजराणा यांच्या हाताला नखाने बोचकले, त्यांना धक्काबुक्की केली. यादरम्यान, गाडीने वेग घेतला होता. गाडी माटुंगा स्टेशनवर पोहचत असताना नजराणा यांनी तिला पोलिसात चल म्हणून सांगितले. त्यामुळे ती महिला अधिकच चिडली आणि तिने नजराणा यांच्या छातीवर व बरगड्यावर जोरदार  ठोसा लगावत डाव्या हाताच्या दंडावर जबर चावा घेतला. माहिम स्टेशन येईपर्यंत ती महिला नजराणा यांना शिवीगाळ करत होती. नंतर माहिम स्टेशन येताच ती गर्दीत पळून गेली.