गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत दिसणार आता एक मराठा लाख मराठा ताकद

मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात  मराठा मूक मोर्चाने आपली ताकद दाखवली आहे. आता हीच ताकत पुन्हा एकदा राज्याची राजधानी मुंबई बघणार आहे. यामध्ये पहिला मोर्चा हा रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाइक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीने केली आहे. कोपर्डीतील नराधमांना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले जाईल, असेही समितीने सांगितले आहे.
 
प्रतिनिधींच्या ९ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १४ डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या सोबत मुंबईतून दिवाळीआधी निघणारा मोर्चा पुढे ढकलल्याचे समितीने सांगितले होते. मात्र मधल्या काळात सरकारवर दबाव राहावा, म्हणून बाइक रॅली काढण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यासाठी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दहिसर, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, शिवडी, वरळी या ठिकाणी बैठका पार पडल्या आहेत. उरलेल्या विभागांतही बैठका सुरू असल्याचे समितीने स्पष्ट केले.त्यामुळे विराट  मोर्चा आगोदर आय मोर्चाने सरकारला जागे ठेवणे हे मुख्य उदिष्ट असणार आहे. मात्र हा मोर्चा निघताना संपूर्ण नियम आणि शांततेत निघणार असून अनेक नियम केले गेले आहेत.
 
यामध्ये मोर्चात गाडी चालवताना चालकाला हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. तर मागे बसलेलेया सहचालक भगवा फेटाधारक असावा लागणार आहे. बाइकवर मराठा क्रांती (मूक) मोर्चा स्टिकर असावे.वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.रॅलीदरम्यान हॉर्न वाजवू नये किंवा घोषणा देऊ नये. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे मार्गक्रमण करावे.तर मोर्चाचे प्रतिनिधित्व महिला करणार आहे.