testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पत्नीवर केला पतीसमोरच अत्याचार सात अटकेत

मुंबई पुन्हा एकदा चर्चेत आली असून
एका लाजिरवाणी घटना घडली आहे. यामध्ये दिवाळीमध्ये मुंबईत नवं घर शोधत असलेल्या
एका २८ वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार झाला आहे. त्यामुळे कायदा आणि प्रशासन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तक्रार समजताच सातजणांना अटक केली
तर यातील एक आरोपी फरार आहे.

मुंबईच्या जोगेश्वरीत रात्री ही घटना घडली आहे.
महिला तिच्या पतीसह जोगेश्वरीतील श्यामनगर झोपडपट्टीत घर पाहण्यासाठी गेली होती. एका स्थानिक महिलेच्या मदतीनं हे जोडपं वेगवेगळी घरं पाहत होतं मात्र ती महिला नंतर निघून गेली होती. हे सर्व पाहून त्या भागातील झोपडपट्टीतील एका टोळक्याची नजर त्या महिलेवर आणि तिचं पतीवर पडली होती. त्यांनी या दोघांना पकडले आणि घरात नेवून बांधून ठेवले. यावेळी आठजणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीसांनी सातजणांना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर फरारी आरोपीला पोलीस शोधात आहे.


यावर अधिक वाचा :