सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (14:56 IST)

मुंबई : पुणे-मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई पुण्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा फोन आला आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमवर हे कॉल आले. त्यात अज्ञाताने सांगितले की, 24 जून रोजी अंधेरी कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार आहे. अज्ञाताने म्हटले की त्याला तातडीने दोन लाख रुपयांची गरज आहे. जर त्याला रक्कम मिळाली तर तो हा बॉम्बस्फोट होण्यापासून थांबवू शकतो.

पुण्यात देखील बॉम्बस्फोट होण्याचे त्याने सांगितले. या बॉम्बस्फोट करण्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहे. दोन लाख रुपये मिळाल्यावर तो मलेशिया आपल्या माणसासोबत बिघून जाणार. धमकीचा हा फोन उत्तरप्रदेशातील जौनपूर वरून आल्याचे समोर आले आहे. 
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. या फोन मुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit