शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईतले सर्वात महागडे घर

मुंबई- रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण आहे. पण ही मंदीची मरगळ झटकून टाकेल अशी आहे. मुंबईतला घराचा सर्वात महागडा सौदा नुकताच दक्षिण मुंबईत झाला. एक फ्लॅट 2.9 लाख रूपये प्रति चौरस फुटांना विकला गेला. 2,152 चौ. फुटांचे घर 45 कोटी रूपयांना विकले गेले. एम्पायर इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष रंजीत मल्होत्रा यांनी हे घर विकत घेतले. 
 
45 कोटींच्या या घरात आहे तरी काय? 
या घरातून म्हणे अरबी सम्रुदाचे सौंदर्य थेट दिसते. अॅशफर्ड पलाजो असे या 19 मजली इमारतीचे नाव आहे. प्रत्येक मजल्यावर एक फ्लॅट आहे. इमारतीतल्या केवळ 12 मजल्यांवर लोक राहतात. कारण 6 मजले पार्किंग, जिम, बैंक्वेट हॉल, मुलांसाठी प्ले एरिया आणि एक सर्व्हिस फ्लोर आहे.
 
मल्होत्रा यांनी या इमारतीच्या 16 व्या मजल्यावर घर घेतले. खालचे 7 मजले सोडले तर असे म्हणता येईल की त्यांनी 9 व्या मजल्यावरचे घर खरेदी केले. नोंदणीनुसार, या फ्लॅटचा बिल्ट-अप एरिया 2,153 चौ. फूट, तर कार्पेट एरिया 1,585 चौ. फूट आहे. रंजीत मल्होत्रा यांची पत्नी उमा यांनी याच इमारतीत आठव्या मजल्यावर घर खरेदी केले आहे. तो फ्लॅटही 45 कोटी रूपयांना विकत घेतला. दोन्ही फ्लॅट्सच्या स्टॅम्प ड्यूटीपोटी मल्होत्रा दाम्पत्याने 2.25 कोटी रूपये भरले आहेत. त्यांना 4 पार्किंग लॉट मिळाले आहेत. दोन्ही पती-पत्नी एम्पायर इंडस्ट्रीत संचालकपदावर आहेत. उमा गरीब मुलांसाठी शाळा चालवतात. रंजीत यांनी टेक्सास विद्यापीठातून एमबीए केले आहे. दक्षिण मुंबईतल्या ताहनी हाइट्समध्ये त्यांचा आणखी एक फ्लॅट आहे.