काय म्हणता, मुंबईकराचं वीजबिल थेट 50 रुपयांनी वाढणार
पुढच्या वर्षी मुंबईकराचं वीजबिल थेट 50 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. खारघर-विक्रोळी दरम्यान नव्या वीजवाहिनीचं काम सुरु आहे. त्यासाठी अतिरिक्त पारेषण शुल्क वसूल करण्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे.
या कामासाठी येणारा 2 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मार्च 2022 मध्ये या वाहिनीचे काम पूर्ण होईल त्यानंतर हा खर्च थेट मुंबईकरांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे मुंबईकरांचे वीजबिलात थेट 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
अदानी ट्रान्समिशन लिमिटेडकडून या वाहिनीची उभारणी सुरू आहे. येत्या काळात दैनंदिन वीज मागणी पाच हजार मेगावॉटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यासाठीच अतिरिक्त वीज पारेषण वाहिन्या उभ्या केल्या जात आहेत.