शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (15:25 IST)

आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बरोबर घ्यायचे नाही - मुश्रीफ

अहमदनगर येथे आगामी नगरपालिका निवडणूक स्व बळावर की महाविकास आघाडी करून लढायची याचा निर्णय स्थानिक पातळीवर आमदार, पक्ष पदाधिकारी यांनी घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला बरोबर घेऊन निवडणूक लढायची नसल्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या आयोजित आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. पालकमंत्री मुश्रीफ मंगळवारी जिल्हा दौर्‍यावर होते. त्यांनी राष्ट्रवादी भवनात पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. जिल्ह्यातील 10 नगरपालिकेच्या निवडणूका होत आहेत.
त्यादृष्टीकोनातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
 
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, येत्या काही दिवसांत होवू घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यास ते जास्त धोक्याचे आहे.
 लोकांच्या वैयक्तीक कामे करण्याकडे लक्ष केंद्रीत केल्यास त्याचा निवडणूकीत फायदा होतो. विकास कामे किती केली, तरी मते मिळतीलच यावर माझा विश्‍वास नाही, त्यामुळे जास्तीत जास्त वैयक्तीक कामे करण्यावर यापुढे पक्षाचा भर असणार आहे.