बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2024 (07:44 IST)

मी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तिकीट मागण्यासाठी केलेली विनंती- सुप्रिया सुळे

supriya sule
विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुनेत्रा पवार यांचे जोरदार प्रयत्नही सुरू असून त्या लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी काल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली. या पोस्टमधून सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली उमेदवारी जाहीर केल्याचंच दिसत होतं. याबाबत चर्चा रंगताच सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितल्याने बारामतीतून मागील दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांना नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. याच चिन्हासह फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी मतदारांना आवाहन केलं होतं. यातून तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर केली आहे का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना खासदार सुळे यांनी म्हटलं की, "ही माझ्या उमेदवारीची घोषणा नसून मी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तिकीट मागण्यासाठी केलेली विनंती आहे," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor