बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाणारची अधिसुचना रद्द केल्याची झाली घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारची अधिसुचना रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे सरकारला शिवसेनेच्या भूमिकेसमोर नमती भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प होऊच नये यासाठी शिवसेनेने प्रचंड दबावतंत्राचा वापर केला होता. 
 
भाजपशी युती करताना नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती. ही अट मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते.