1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 मार्च 2018 (10:48 IST)

भगवानगड भाषणमुक्त झाल्यामुळे तो विषय संपला

Namdev Shastri
श्री क्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची सुरुवात भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या हस्ते झाली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खासदार प्रीतम मुंडे, भगवानगडाचे प्रधान आचार्य ह.भ.प.श्री.नारायण शास्त्री, ह.भ.प.विवेकानंद महाराज शास्त्री, ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री, ह.भ.प.बाबासाहेब महाराज बडे, माजी आमदार सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 

श्री संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाची सुरुवात  झाली. यावेळी महंत शास्त्रीजी म्हणाले की, भाषणाचा वाद हा केवळ श्री क्षेत्र भगवानगडापुरता मर्यादित होता. भगवानगड भाषणमुक्त झाल्यामुळे तो विषय आता संपलेला आहे.  यावेळी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की,  मी नेता म्हणून नव्हे तर बीड जिल्ह्याची लेक म्हणून या सप्ताहाला आले आहे असे सांगितले. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनीं देखील गडासंदर्भातील आपली भूमिका मांडली.