नांदेड : पेनगंगा नदीच्या काठी कुटुंबासमोर तीन मुली बुडाल्या
नांदेड येथे किनवट तालुक्यात सोमवारी दुपारी पेनगंगाच्या काठावर नातेवाईकांसोबत मटण पार्टीसाठी गेलेल्या एका कुटुंबातील तीन मुली बुडाल्याची घटना घडली आहे.
ममता शेख जावेद, वर्षीय पायल देविदास कांबळे आणि स्वाती देविदास कांबळे अशी मृत मुलींची नावे आहे
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास कांबळे आणि त्यांचे नातेवाईक किनवट तालुक्यातील मारेगाव लहान येथे पैनगंगा नदीवर मटण पार्टीसाठी गेले होते. सर्वांनी जेवण केले नंतर
शेख जावेद, मिथुन बिहारी, ममता शेख जावेद, पायल कांबळे, स्वाती कांबळे व इतर काही जण आंघोळीसाठी नदीवर गेले. सर्व जण पाण्यात एकमेकांवर पाणी टाकत आनंद घेत असताना त्यातील एक मुलगी पाण्यात बुडू लागली तिला वाचवण्यासाठी इतर दोघी गेल्या असता त्या देखील पाण्यात बुडाल्या. या घटनेत पायल कांबळे, स्वाती कांबळे या दोघी सक्ख्या बहिणींचा मृत्यू झाला तर ममता शेख जावेद ही नातेवाईक होती.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळतातच ते घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जीवरक्षकांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढले आणि शव विच्छेदनासाठी पाठविले.
अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Edited by - Priya Dixit